इंडिया आघाडीचे खर्गे आणि मोदींमध्ये मोठा फरक, जनता मोदींनाच… अजित पवार यांचं मोठं वक्तव्य काय?
अजित पवार यांचे काका शरद पवार आणि त्यांच्यातल्या काही भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र अजित पवार यांनी स्पष्ट केले की, या पुढचा मार्ग भाजपसोबतच.. तर शरद पवार यांच्यासोबत कुठलीही फिक्सिंग नाही, असं अजित दादांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलंय.
मुंबई, २३ डिसेंबर २०२३ : अजित पवार यांचे काका शरद पवार आणि त्यांच्यातल्या काही भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र अजित पवार यांनी स्पष्ट केले की, या पुढचा मार्ग भाजपसोबतच.. तर शरद पवार यांच्यासोबत कुठलीही फिक्सिंग नाही, असं अजित दादांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलंय. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे म्हटले की, सोबत आलेल्यांना फसवणार नाही आणि भूमिकेतही बदल करणार नाही, असे जाहीरपणे आश्वत केले. भेटीगाठी कौटुंबिक कुठेही मॅच फिक्सिंग नाही. आमच्या सोबत आलेल्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. कमळाच्या चिन्हावर आपण लढणार नाही, घड्याळावरच महायुतीत लढणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना काळजी घ्या, आरक्षण दिलं पाहिजे असं बोला. इंडिया आघाडीचे खर्गे आणि मोदींमध्ये मोठा फरक आहे. खर्गे आणि मोदींमध्ये जनता मोदींनाच निवडेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केलाय.