अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर विदर्भातील बड्या नेत्यांची शिवसेनेत होणार एन्ट्री, कुणी केला दावा?

| Updated on: Mar 12, 2023 | 9:44 PM

VIDEO | लवकरच विदर्भात शिवसेनाचा मोठा विस्तार होणार, नागपूरमधील शिवसेनेच्या नेत्यानं केला दवा, बघा काय म्हणाले....

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे नागपूरमधील शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याने एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन काय असणार हे कळणार आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याची वाट एकनाथ शिंदे यांची शिवसेना बघत असल्याचेही कृपाल तुमाने यांनी सांगितले. विदर्भातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता वेगळ्या पद्धतीने राजकीय डावपेच केले आहेत. शिवधनुष्य यात्राही नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, सिंदखेडा राजा अशा पद्धतीने होणार असल्याने या यात्रेकडे आता राज्यातील महत्वाच्या पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

Published on: Mar 12, 2023 09:44 PM
राज ठाकरे यांच्या युतीची आम्हाला गरज…, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
अडीच वर्षे फक्त फेसबुकवरचे मुख्यमंत्री, नाव न घेता कुणी लगावला उद्धव ठाकरे यांना टोला