Special Report | एसटीचा संप कधी मिटणार?-TV9

| Updated on: Jan 12, 2022 | 9:00 PM

काही ठिकाणी अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, त्यामुळे या काळात लोकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांना ‘अच्छे दिन’ आले. अनेक खासगी वाहतुकदारांनी भाडे वाढवले, त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागल्याचे दिसून आले.

गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (St workers strike) संप सुरू आहे, काही ठिकाणी काही बसेस (bus) सुरू झाल्या आहेत, मात्र काही ठिकाणी अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, त्यामुळे या काळात लोकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांना ‘अच्छे दिन’ आले. अनेक खासगी वाहतुकदारांनी भाडे वाढवले, त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागल्याचे दिसून आले. पुण्यातली एसटी बससेवा सुरू होताच एस एसटी महामंडळाने खाजगी वाहतूकदारांना दणका दिलाय, कारण स्वारगेट आगार आणि पुणे विभागातील डेपोतून होणारी खाजगी वाहतूक बंद करण्याचे आदेश काढण्यात आलेत. खाजगी वाहतूकदारांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काल रात्री एसटी महामंडळानं काढलं पत्रक काढत हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे खासगी वाहतुकदारांचे मोठे नुकसान होणार आहे.

Special Report | संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज!-TV9
Special Report | दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतला फरक काय?-TV9