Bihar चे मुख्यमंत्री Nitish Kumar यांच्या सुरक्षेत मोठी चूक

Bihar चे मुख्यमंत्री Nitish Kumar यांच्या सुरक्षेत मोठी चूक

| Updated on: Mar 27, 2022 | 8:43 PM

पाटणा मधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांच्यावर एका युकवानं हल्ला केला. त्यानं नितीश कुमार यांना बुक्की मारली आहे. यामध्ये नितीश कुमार हे जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बख्तियारपूरमध्ये गेले होते.

पाटणा: बिहार (Bihar) चे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी पकडले आहे. आरोपीनं नितीश कुमार यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिसांकडून (Bihar Police) मिळत असलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा व्यक्ती हा मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आलं आहे. मात्र, नितीश कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. पाटणा मधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांच्यावर एका युकवानं हल्ला केला. त्यानं नितीश कुमार यांना बुक्की मारली आहे. यामध्ये नितीश कुमार हे जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बख्तियारपूरमध्ये गेले होते.

Imtiyaz Jaleel यांचं खळबळजनक वक्तव्य
Special Report | निधीवाटपावरुन बोलताना Ajit Pawar यांची गाडी घसरली-tv9