गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा, सनद निलंबित करण्यासंदर्भात ‘बार काऊंसिल’चा मोठा निर्णय

| Updated on: Feb 29, 2024 | 4:54 PM

किल गुणरत्न सदावर्ते यांना बार काऊंसिल ऑफ इंडियाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरता निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिल ऑफ इंडियाने मोठा निर्णय दिला आहे. बघा नेमकं काय आहे प्रकरण?

Follow us on

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : वकिल गुणरत्न सदावर्ते यांना बार काऊंसिल ऑफ इंडियाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरता निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिल ऑफ इंडियाने मोठा निर्णय दिला आहे. गोवा बार काऊंसिलने गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. अशातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलने शिस्तभंगाची कारवाई करत गुणरत्न सदावर्तेंची सनद निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने सनद निलंबनाचा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.