आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम… उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी तर भास्कर जाधव आणि सुनील प्रभू…

| Updated on: Nov 25, 2024 | 4:23 PM

नुकतीच आज शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार देखील उपस्थितीत होते. ही बैठक उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली.

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतीच आज शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार देखील उपस्थितीत होते. ही बैठक उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून आदित्य ठाकरेंच्या वाटेला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे. तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील. यासंदर्भात भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ही माहिती दिली.

Published on: Nov 25, 2024 04:22 PM
मनसे महायुतीत जाणार? ‘भाजपशी जवळीक फायद्याची…’, पराभवानंतर नेत्यांनी राज ठाकरेंच्या पुढे मांडली भूमिका
Sharad Pawar NCP : पिपाणी अन् तुतारीचं कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा, ट्रम्पेटचा बसला फटका