उद्योग विभागानं काढली ‘त्या’ 4 प्रकल्पांबाबतीत श्वेतपत्रिका, उदय सामंत यांच्याकडून श्वेतपत्रिकेत मोठा खुलासा

| Updated on: Aug 04, 2023 | 9:37 AM

VIDEO | परराज्यात गेलेल्या 'त्या' 4 प्रकल्पाबांबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून श्वेतपत्रिकेत मोठा खुलासा, मविआची कोंडी होणार?

मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्राबाहेर गेलेल्या काही मोठ्या प्रकल्पांसंदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काल विधिमंडळात सादर देखील करण्यात आली आहे. उदय सामंत यांच्याकडून ही श्वेतपत्रिका विधिमंडळात सादर करण्यात आली. तर वेदांता फॅाक्सकॅान, एअरबस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्यबाहेर का गेले याची श्वेतपत्रिकेत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर न जाता यातील काही प्रकल्प महाविकास आघाडीच्या उदासीनतेमुळेच राज्याबाहेर गेल्याचा दावा उदय सामंत यांनी काल केल्याचे पाहायला मिळाले. मोठे आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प केवळ गेल्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवरमुळेच राज्याबाहेर गेल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. यानंतर मविआमध्ये एकच खळबळ उडाली असून चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी श्वेतपत्रिकेत केलेल्या मोठ्या खुलाशानंतर महाविकास आघाडी अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Published on: Aug 04, 2023 09:37 AM