मुंबई महापालिकेचा ‘हा’ मोठा घोटाळा, त्याचा पैसा परदेशात गेला? किरीट सोमय्या यांना शंका

मुंबई महापालिकेचा ‘हा’ मोठा घोटाळा, त्याचा पैसा परदेशात गेला? किरीट सोमय्या यांना शंका

| Updated on: Apr 01, 2023 | 7:15 PM

VIDEO | 'त्या' 900 कोटींच्या घोटाळ्याला जो जबाबदार असेल..., किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

मुंबई : मुंबईतील दहिसर पश्चिमेतील कांदरपाडा परिसराला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी यादेखील हजर होत्या. CAG मधून असे म्हटले आहे की, हा मुंबई महापालिकेचा मोठा घोटाळा आहे. त्याचा पैसा कुठे गेला. तो परदेशात तर गेला नाही ना? आयकर विभाग, ईडी, मुंबई पोलीस किंवा अँटी करप्शनने याची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली. ही टाऊनशिप महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टी म्हणून घोषित केली होती. SRA महापालिकेला द्यायला तयार होती. मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता होती. माफिया सेनेने हा प्रस्ताव 2 नोव्हेंबर 2019 ला फेटाळला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी 29 एप्रिल रोजी महापालिकेला ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Published on: Apr 01, 2023 07:06 PM
कालीचरण महाराज यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी नेत्याची सडकून टीका
शरद पवार आणि नितीन गडकरी यांची नागपुरात दीड महिन्यात दुसरी भेट, काय झाली चर्चा?