VIDEO : काश्मीर फाईल इंटरवलनंतर फार बोअरींग सिनेमा, Jayant Patil यांची विधानसभेत फटकेबाजी
जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून डिस्टर्ब करत होते. हा प्रकार लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा. आम्हालाही खाली बसून बोलता येते, त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका, असे खडेबोलच पाटील यांनी सागर यांना सुनावले.
‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून डिस्टर्ब करत होते. हा प्रकार लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा. आम्हालाही खाली बसून बोलता येते, त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका, असे खडेबोलच पाटील यांनी सागर यांना सुनावले. सभागृहात पहिल्यांदाच शांत असणारे जयंत पाटील संतापलेले पाहायला मिळाले. यावेळी ‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजप सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली.