VIDEO : Devendra Fadnavis | साखर कारखान्यांना आयकरच्या जाचातून अमित शाह यांनी सोडवलं – देवेंद्र फडणवीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सध्या अमित शाह (Amit Shah) अहमदनगरमधील प्रवरानगर मध्ये आहेत. तर, आज सायंकाळी ते पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. आज आणि उद्या अमित शाह पुण्यात असतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सध्या अमित शाह अहमदनगरमधील प्रवरानगर मध्ये आहेत. तर, आज सायंकाळी ते पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. आज आणि उद्या अमित शाह पुण्यात असतील. अमित शाहांचा पुण्यातील मुक्काम व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये असेल. अहमदनगरमधील कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साखर कारखान्यांना आयकरच्या जाचातून अमित शाह यांनी सोडवले आहे. अमित शाह यांच्या कार्यालयानं खासगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको असं जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो.