VIDEO : Eknath Shinde | नारायण राणे यांचं वक्तव्य चुकीचं, मी माझ्या पक्षात समाधानी : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी पक्षात समाधानी आहे. राणेंनी जे सांगितलं त्यात तथ्य नाही. ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला जर स्वातंत्र्य नसतं तर मी हे निर्णय घेऊ शकलो नसतो.