VIDEO : Pankaja Munde | ‘सरकार आलंय,मंत्रीपद मिळाल्यास तुमचा विकास करेन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत आज परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत आज परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतःची घरी ध्वजारोहण केले त्यानंतर तिरंगा रॅलीत सहभागी झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी पंकजा मुंडेंनी ढोल वाजवून रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांची स्फूर्ती वाढविली. तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांनी अनेक वेशभूषा परिधान केले होते. या रॅलीनंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, सरकार आलंय, मंत्रीपद मिळाल्यास तुमचा विकास करेन…
Published on: Aug 13, 2022 01:39 PM