VIDEO : Ramdas Kadam Live Uncut | कोण अरंविद सावंत? विनायक राऊतांची औकात आहे का ? – रामदास कदम
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र पाठवले होते. यानंतर आज रामदास कदम यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. रामदास कदम म्हणाले की, कोण अरंविद सावंत? विनायक राऊतांची औकात आहे का ? हे सर्व बोलताना रामदास कदम यांना अश्रू देखील रोखता आले नाहीत.
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र पाठवले होते. यानंतर आज रामदास कदम यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. रामदास कदम म्हणाले की, कोण अरंविद सावंत? विनायक राऊतांची औकात आहे का ? हे सर्व बोलताना रामदास कदम यांना अश्रू देखील रोखता आले नाहीत. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत जाणं चुकीचं होतं हे सांगताना रामदास कदम म्हणाले, ‘ बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाची शिवसेना या घोषवाक्यांने सुरुवात केली. त्यांनी हिंदुत्वासाठी अख्ख आयुष्य घालवलं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आयुष्यभर संघर्ष केला. त्या शिवसेनाप्रमुखांचा चिरंजीव राष्ट्रवादीसोबत बसून मुख्यमंत्री होतो हे कळल्यावर मी त्यांना हात जोडले. म्हटलं उद्धव जी, हे पाप करू नका. हे साहेबांना आवडणार नाही.