VIDEO : शिवसेनेच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ नाही- Sanjay Raut
खरे जनाब सेनावाले कोण आहेत, हे महाराष्ट्रात जाऊन शिवसेना खासदार सांगणार आहेत. एमआयएमला कोण युती मागितली. खरे तर एमआयएम आणि भाजपची हातमिळवणी झाली आहे. भाजपने शिवसेनेची बदनामी करा, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा असा आदेश एमआयएमला दिला आहे. हा कट शिवसेनेने उधळून लावला आहे.
खरे जनाब सेनावाले कोण आहेत, हे महाराष्ट्रात जाऊन शिवसेना खासदार सांगणार आहेत. एमआयएमला कोण युती मागितली. खरे तर एमआयएम आणि भाजपची हातमिळवणी झाली आहे. भाजपने शिवसेनेची बदनामी करा, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा असा आदेश एमआयएमला दिला आहे. हा कट शिवसेनेने उधळून लावला आहे. याविरोधातच आता शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. त्यातून सारा महाराष्ट्र पिंजून काढू आणि खरी जनाब सेना कोण, हे साऱ्यांना सागू, असा इशारा रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. शिवाय एमआयएमसोबतच्या युतीच्या साऱ्या शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या भेटीतच जलील यांनी टोपे यांना युतीची ऑफर दिली.