VIDEO : एका योद्धाला नमन करायला मी शिवसेनेकडून आलो -Sanjay Raut

| Updated on: Jan 13, 2022 | 2:28 PM

संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्यात मुझफ्फरनगर येथे भेट झाली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. फक्त उद्धव ठाकरे यांनी टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्यात मुझफ्फरनगर येथे भेट झाली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. फक्त उद्धव ठाकरे यांनी टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे. दरम्यान, शिवसेना उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केलेला आहे. बलिदान दिलेलं आहे. अयोध्येचं आंदोलन थंड पडलेलं असताना, उद्ध ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन वेळा तिथे गेलो. नंतर या विषयला चालना मिळाली. सध्या कोर्टाच्या आदेशाने तिथे मंदिर उभं राहत आहेत. अयोध्येत तसेच मथुरा या मतदार संघातही आमचा उमेदवार असेल, असे राऊत म्हणाले.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 January 2022
VIDEO : मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय फक्त मनसेचंच, Raj Thackeray यांचं पत्र