VIDEO : SanjayKaka Patil | माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार : संजयकाका पाटील
भाजपच्या एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केले आहे. माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केले. ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भाजपच्या एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केले आहे. माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केले. ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले.