VIDEO : Sudhir Mungantiwar | ठाकरे सरकारच्या चुकांचं प्रायश्चित्त ओबीसी बांधवाना घ्यावं लागतंय : मुनगंटीवार
राज्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरणारा आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातली महाराष्ट्र सरकारची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे.
राज्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरणारा आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातली महाराष्ट्र सरकारची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुका होणार की पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाणार याची उत्सुकता आहे. येणाऱ्या काळातही या मुद्द्यावरून जोरदार राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. ठाकरे सरकारच्या चुकांचं प्रायश्चित्त ओबीसी बांधवाना घ्यावं लागतंय असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.