VIDEO : Zahid Qureshi LIVE | समीर मुस्लिमच, वडिलांचं नावही दाऊद, वानखेडेंचे आधीचे सासरे झाहिद कुरेशींचा दावा

| Updated on: Oct 28, 2021 | 12:44 PM

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी टीव्ही-9 शी खास बातचीत करताना दिली.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी टीव्ही-9 शी खास बातचीत करताना दिली. “समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते. शबाना कुरेशीसोबतचा विवाह मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार पार पडला होता. समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद होते, समीरच्या बहिणीचेही लग्न मुस्लिम कुटुंबात झाले आहे”, असं त्यांनी सांगितलं.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 28 October 2021
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 October 2021