Kalyan लोकसभा मतदारसंघाची पुन्हा चर्चा, कोण होणार २०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार?

| Updated on: Sep 24, 2023 | 7:06 PM

VIDEO | मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याने पुन्हा कल्याण लोकसभा मतदारसंघ चर्चेत आले आहे, अशातच भाजप नेत्यानं कल्याणचा पुढचा खासदार कोण होणार? हेच जाहीर केलंय

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | कल्याण लोकसभेची वाटचाल बीजेपी उमेदवाराच्या दिशेने चालली आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केल्यानं कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, भाजपा नेते रविंद्र चव्हाण देखील यासंदर्भात भाष्य केले आहे. “महायुतीत विघ्न आणण्याच काम काही लोकांकडून सुरु आहे” असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील. 45 पेक्षा जास्त खासदार कसे निवडून आणता येतील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये कुठेतरी विरजण घालण्याच काम काहीजण करतायत. मला खात्री आहे, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून खासदार होतील” असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

Published on: Sep 24, 2023 07:06 PM
आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही ! बघा कुठंल आहे भीषण वास्तव?
‘खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं’, एकनाथ खडसे यांना पुन्हा कुणी डिवचलं?