VIDEO : नाही तर म्हणाल Ajit Pawar नव्या पिढीवर घसरले, अजितदादांची तुफान फटकेबाजी | Raigad |

| Updated on: Feb 27, 2022 | 2:50 PM

आई-वडील कष्टाने मुला-मुलींना शिकवतात. त्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या गावी पाठवतात. पण मुलं तिकडे गेली का तिकडेच लग्न करतात आणि तिकडेच सेटल होतात. परत यायच नावच घेत नाही. सर्वच पिढी असं करत नाही. काही पिढी असं करते. नाही तर म्हणाल अजित पवार नव्या पिढीवर घसरले.

आई-वडील कष्टाने मुला-मुलींना शिकवतात. त्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या गावी पाठवतात. पण मुलं तिकडे गेली का तिकडेच लग्न करतात आणि तिकडेच सेटल होतात. परत यायच नावच घेत नाही. सर्वच पिढी असं करत नाही. काही पिढी असं करते. नाही तर म्हणाल अजित पवार नव्या पिढीवर घसरले. पण काही पिढी असे करते, असं सांगतानाच आम्हाला मुंबईत जास्त वेळ राहिलो तर परत बारामतील कधी जातो असं होतं. पण काही बंडलबाज पोरंपण जन्माला येतात. एका वयस्कर वडिलांना मुलाने विमानतळावर सोडल आणि बाहेरगावी निघून गेला हे बरोबर नाही. माणुसकी विसरू नका. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचेही असतात हे कायम लक्षात ठेवा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार  म्हणाले.