मराठा आरक्षणाची घोषणा कधीही होऊ शकते, शिंदे सरकारमधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 30, 2023 | 4:09 PM

Sanjay Rathod on Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. आज सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. अशातच शिंदेंच्या मंत्र्यानं मोठं वक्तव्य केले आहे

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत आहे. दरम्यान, आज सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. अशातच त्यांची प्रकृती अत्यंत ढासळलेली आहे. वारंवार सरकारकडून प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले जात असताना त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. अशातच शिंदे सरकारमधील एका मंत्र्यांनं मोठं वक्तव्य केले आहे. मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते हे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं म्हणून अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. करत असलेल्या आंदोलनामागील त्यांची भूमिका देखील योग्य आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांना वारंवार मागणी करत आहेत की वेळ द्यावा, कारण मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असून तशी भूमिकाच राज्य सरकारची आहे. यानंतर लगेच यासंदर्भातील मोठी घोषणा देखील होऊ शकते, असे मोठे वक्तव्यही मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Published on: Oct 30, 2023 04:09 PM
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली, स्टेजवर उभं राहताच कोसळले अन्…
Maratha Protest : आरक्षण मिळावं म्हणून जलसमाधी आंदोलन, मराठा आंदोलक कुठं उतरले थेट पाण्यात?