सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होणार?

| Updated on: Apr 15, 2024 | 12:44 PM

आरोपी विशाल उर्फ काळू हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने स्वीकारली आहे. तर अनमोल बिश्नोईच्या फेसबुक अकाऊंटची सत्यता पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांचं या प्रकरणाकडे लक्ष असून ते तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आरोपी विशाल उर्फ काळू हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने स्वीकारली आहे. तर अनमोल बिश्नोईच्या फेसबुक अकाऊंटची सत्यता पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे. अनमोल बिश्नोई याने गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा याच्याकडे सोपवली होती. गोदारा याच्याकडे 12 पेक्षाही जास्त प्रोफेशनल शूटर्स असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. यासह मोठी अपडेट म्हणजे सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट एक महिन्यापूर्वीच रचण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेतच हा कट रचला गेला असेही सांगितले जात आहे.

Published on: Apr 15, 2024 12:44 PM
अजित दादा आणि अमोल कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांचं काम चांगल पण…
महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांना उन्हाच्या झळा बसणार, हवामान खात्याचा इशारा