पालघरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत मोठं अपडेट

पालघरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत मोठं अपडेट

| Updated on: Apr 01, 2023 | 5:20 PM

VIDEO | मुंबईजवळ पालघरच्या समुद्र किनारी संशयास्पद बोट, बोटीवर पाकिस्तानी खलाशी? काय आली महत्त्वाची माहिती समोर

मुंबई : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून काही वेळापूर्वी एक मोठी बातमी समोर आली होती. मुंबईनजीकच्या पालघर समुद्र किनाऱ्यावर काही अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली होती. आज सकाळीच नौदलाला पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर ही संशयास्पद हालचाल दिसून आली. नौदलाने या संशयास्पद बोटीची माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना दिल्यानंतक ही बोट पाकिस्तानातून आली असून त्यावर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची शंकाही व्यक्त केली जात होती. मात्र याप्रकरणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पालघर समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या बोटीवर पाकिस्तानी खलाशी नाहीत. भाईंदर उत्तनचे मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी टिव्ही ९ मराठीला यासंदर्भातील माहिती दिली आहे. पाकिस्तानी बोट असल्याची ही अफवा आहे. तर या बोटीवर एकूण १५ खलाशी असून त्या बोटीचा मालकही त्या बोटीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Published on: Apr 01, 2023 05:20 PM
‘एप्रिल फूल, कधी होणार पलावा पूल’, ‘मनसे’नं केली बॅनरबाजी
हिंदुत्व रक्तात असेल तर…, मनसे नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारला दिला इशारा