संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग नोटीशीवरून मोठी बातमी, आज संध्याकाळी उत्तर द्यावं लागणार अन्यथा…
VIDEO | 'कायद्याचं राज्य असल्याने कायदेशीर उत्तर द्यावं लागेल', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग नोटीशीवरून मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याने संजय राऊत यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचे समोर आले आहे. तर हा समस्त विधिमंडळाचा, महाराष्ट्राचा अपमान असल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.विधानसभा अध्यक्षांनी संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. यानुसार संजय राऊत यांना बुधवारीच नोटीस देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. संजय राऊत यांना आज संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत हक्कभंगासंबंधी नोटिशीला उत्तर द्यावं लागणार आहे. मात्र आजपर्यंत मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. बघा काय म्हणाले संजय राऊत…
Published on: Mar 03, 2023 11:51 AM