सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये? बघा EXCLUSIVE अपडेट

| Updated on: Apr 15, 2024 | 10:24 PM

पनवेलमधील हरिग्राम गावात या प्रकरणातील आरोपी महिनाभर राहत होते. याच पनवेलमधील हरिग्रामच्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्येच आरोपींनी हा कट रचल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपींनी राहण्यासाठी नव्यानं बांधलेली इमारत निवडली होती. याच नव्या इमारतीत आरोपी....

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील EXCLUSIVE बातमी समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या ठिकाण्यावर टीव्ही ९ ची टीम लक्ष ठेवून आहे. तर सूत्रांकडून या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट मिळतेय. पनवेलमधील हरिग्राम गावात या प्रकरणातील आरोपी महिनाभर राहत होते. याच पनवेलमधील हरिग्रामच्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्येच आरोपींनी हा कट रचल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपींनी राहण्यासाठी नव्यानं बांधलेली इमारत निवडली होती. याच नव्या इमारतीत आरोपी महिनाभर वास्तव्यास होते, असेही सूत्रांनी सांगितले. सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट एक महिन्याभरापूर्वीच रचण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली तर हा कट भारतात नाही तर अमेरिकेत रचला गेला. अशीही माहिती समोर आली होती.

Published on: Apr 15, 2024 10:24 PM
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, धैर्यशील मोहितेंचा कुणावर निशाणा?
‘मोदीची गॅरंटी संकल्प’ पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी नेमकं काय?