बिहारमध्ये नितीशकुमार यांचा भाजपला बाजूला सारत आरजेडी आणि काँग्रेसशी घरोबा
नितीशकुमार यांनी मंगळवारी भाजपला पुन्हा धक्का दिला. भाजपशी काडीमोड घेत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलासह अन्य घटकपक्षांच्या महाआघाडीचे नेते म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला.
बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झालेलं आहे. जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेस महाआघाडीचं सरकार काँग्रेसमध्ये आलंय. नितीश कुमार हे दुपारी 2 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमारांचा भाजपला बाजूला सारत आरजेडी आणि काँग्रेसशी आता घरोबा झाला आहे. नितीशकुमार यांनी मंगळवारी भाजपला पुन्हा धक्का दिला. भाजपशी काडीमोड घेत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलासह अन्य घटकपक्षांच्या महाआघाडीचे नेते म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला.