Hyderabad | हैदराबादमध्ये भरधाव बाईकचा अपघात, बाईकस्वार ठार

| Updated on: Aug 09, 2021 | 4:21 PM

हैदराबादमध्ये एका वेगवान दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने चालकाचा तोल गेला. या अपघातात अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना  हैदराबादच्या उप्पल पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.

हैदराबादमध्ये एका वेगवान दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने चालकाचा तोल गेला. या अपघातात अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना  हैदराबादच्या उप्पल पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. उप्पल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व रेवंत यादव (21) नावाचा युवक शनिवारी, रविवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दुचाकीने आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता, परत येताना  तो अतिशय वेगात आला होता.  रमांतपूरजवळ त्याच्या दुचाकीने तोल गमावला आणि दुभाजकाला धडक दिली. या अपघातात त्याला जोरदार धडक बसली, टक्करेनंतर तो खाली पडला, डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 9 August 2021
Raosaheb Danve | क्यूआर कोड तपासणी राज्याने उभी करावी : रावसाहेब दानवे