VIDEO : Tamilnadu | तामिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळले, सहापैकी 3 जणांना वाचविण्यात यश
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बिपीन रावत हे पत्नीसह उटीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. मात्र, कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही दुर्घटना घडली.
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बिपीन रावत हे पत्नीसह उटीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. मात्र, कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत सहापैकी 3 जणांना वाचविण्यात यश आले आहे.