Bipin Rawat Death | CDS बिपीन रावत यांचा मृत्यू, देशासाठी मोठी दु:खद घटना : देवेंद्र फडणवीस
'भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीन रावतजी यांच्याशी नागपुरातील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये झालेली भेट संस्मरणीय होती. या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेले जनरल रावतजी, त्यांच्या पत्नी आणि अन्य सैन्य अधिकार्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली', अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. रावत यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत.
‘भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीन रावतजी यांच्याशी नागपुरातील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये झालेली भेट संस्मरणीय होती. या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेले जनरल रावतजी, त्यांच्या पत्नी आणि अन्य सैन्य अधिकार्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.