Bipin Rawat | बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा शेवटचा व्हिडीओ

| Updated on: Dec 09, 2021 | 9:28 PM

हा अवघा 20 सेकंदाचा व्हिडीओ आहे. दुपारच्यावेळी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत चार महिला आणि एक पुरुष दिसत आहे. घनदाट जंगलात हे लोक दिसत आहेत.

चेन्नई: सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, हा व्हिडीओ खरा असल्याचं आढळून आलं आहे. टीव्ही9च्या रिपोर्टरने घटनास्थळी जाऊन या संपूर्ण परिसराची पाहणी केली असता हा व्हिडीओ खरा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अवघा 20 सेकंदाचा व्हिडीओ

हा अवघा 20 सेकंदाचा व्हिडीओ आहे. दुपारच्यावेळी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत चार महिला आणि एक पुरुष दिसत आहे. घनदाट जंगलात हे लोक दिसत आहेत. या ठिकाणी रेल्वे रुळ दिसत असून रुळाच्या दोन्ही बाजूने गर्द झाडी दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमच्या रिपोर्टरने या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी थेट कुन्नूरच्या जंगलात गेला. त्यावेळी व्हिडीओतील तिच जागा तिथे आढळून आली. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याचं दिसून आलं आहे.

Published on: Dec 09, 2021 09:28 PM
Bipin Rawat | बिपीन रावत यांचं पार्थिव सुलूर एअरबेसवरून दिल्लीसाठी रवाना
Special Report | मुंबईवरचा हल्ला ते केदारनाथ…MI-17 चं महत्व काय?-TV9