बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनाऱ्यावर कचऱ्याचा ढीग, बघा व्हिडीओ कशी आहे परिस्थिती?

| Updated on: Jun 16, 2023 | 3:09 PM

VIDEO | बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका, समुद्रातील उसळलेल्या लाटांमुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचा ढीग, बघा कचऱ्यांच्या ढीगानं व्यापलेला समुद्र किनारा

Follow us on

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात उंचच उंच लाटा उसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात टाकलेला सर्व कचरा किनारपट्टीवर आल्याने किनारपट्टीवर भीषण चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर मोठा कचऱ्याचा ढीग जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे सुटत असलेल्या वेगवान वाऱ्यामुळे शेकडो टन प्लॅस्टिक मुंबईच्या दादर किनारपट्टीवर जमा झाले आहे. मुंबईतील विविध चौपाट्यांवर सध्या असंच चित्र दिसतंय. दादर चौपाटी परिसरात मोठ्या प्रमाणात पसरलेला हा कचरा मुंबई महापालिकेकडून गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे प्लास्टीकचा वापर किती प्रमाणात करायचा हे प्रत्येकाने वेळीच ठरवंणं गरजेचं आहे. दरम्यान, गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ धडकले आहे. प्रचंड वेगाने त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीकडे झाला. गुजरातमध्ये आज दुपारपासून त्याचा परिणाम ओसरणार आहे. त्यानंतर राजस्थानकडे चक्रीवादळाचा प्रवास होणार आहे.