‘मुख्यमंत्रीसाहेब न्याय द्या’, कोणत्या कर्मचाऱ्यांनी काढला बिऱ्हाड मोर्चा?

| Updated on: Jun 13, 2023 | 4:03 PM

VIDEO | राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा, काय आहे कारण?

नाशिक : नाशिकच्या गोल्फ क्लब येथून राज्यभरातील आदिवासी विभागातील रोजंदारीवरील वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढला आहे. गेल्या दहा वर्षांपासून रोजंदारीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे आणि इतर प्रमुख मागण्यासाठी हे मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने निघाले आहे. ‘सीएम साहेब न्याय द्या’ अशी आर्त हाक हे मोर्चेकरी मारत आहे. या मोर्चातील एका कर्मचाऱ्याने आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्या व्यथा शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केलाय. ‘पाठीवरती मारा, पण नका मारू पोटी’ असे गीत या कर्मचाऱ्याने सादर केले आहे. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी असून मंत्रालयापर्यंत जाण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 25 मे 2023 रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, तसेच दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे आणि त्यांना सेवेतून कमी करू नये अशा प्रमुख मागण्या घेऊन हे मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने जात आहे. या मोर्चा लहान मुलांना घेऊन महिला आणि तसेच काही दिव्यांग बांधव देखील सहभागी झाले आहे.

Published on: Jun 13, 2023 04:03 PM
VIDEO | फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द? जाहिरातीचं कारण की आणखी काही? राजकीय चर्चांना उधाण
गजानन किर्तीकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याचं भाष्य; म्हणाले, ‘टाळी एका हाताने…’