You are The Most Active Mayor, तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील, राज्यपालांकडून पेडणेकरांचं कौतुक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते आज राज्यपाल कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज राजभवनावर जात त्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते आज राज्यपाल कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज राजभवनावर जात त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनीही महापौर पेडणेकर यांचं तोंडभरुन कौतुक केलंय.
यू आर दी मोस्ट अॅक्टिव्ह मेयर, तुम्हाला तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील अशा शब्दात कोश्यारी यांनी महापौर पेडणेकर यांचं कौतुक केलंय. कुणाचाही वाढदिवस असला तर आपण शुभेच्छा देतोच. शहराची प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यास गेले. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलीचं कौतुक करावं तशा पद्धतीने राज्यपाल आणि माझं बोलणं झालं, अशा भावना या भेटीनंतर महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केल्यात. इतकंच नाही तर ‘मला प्रोटोकॉल रोखतो, नाहीतर मलाही तुमच्या घरी यायला, सर्वांना भेटायला आवडलं असतं’, असं राज्यपाल म्हणाल्याचंही महापौरांनी सांगितलं.