Dadar | 12 आमदार निलंबन आणि ओबीसी आरक्षणाविरोधात दादर परिसरात भाजपचं आंदोलन
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर भाजपं आक्रमक झाला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. खरंतर या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारवर भारी पडेल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारनेच भाजपवर अधिवेशनात हल्लाबोल केला. भास्कर जाधव यांनी गोंधळ करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. यानंतर भाजपाकडून अनेक टीका-टीपण्या करण्यात येत आहे. त्यात या निलंबनाविरोधात ओबीसी आरक्षणाविरोधात दादर परिसरात भाजपने आंदोलन केलं आहे.
Published on: Jul 10, 2021 12:12 PM