भाजप अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, कोणाविरूद्ध कोण विधानसभेच्या आखाड्यात उतरणार?

| Updated on: Oct 27, 2024 | 10:55 AM

भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवार दिलेत आणि दुसऱ्या यादीत २२ उमेदवार घोषित केलेत. यामध्ये दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला. तर दुसऱ्या यादीनुसार भाजप आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांशी तगडी टक्कर होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्षाकडून दुसरी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये २२ उमेदवारांना विधानसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलं. भाजपने कामठी येथून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापून चंद्रशेखऱ बावनकुळे यांना उमेदवारी दिली. गडचिरोलीमधून देवराव होळी या विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं अन् मिलिंद नरोटे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं. वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट करून श्याम खोडेंना तिकीट जाहीर केलं. दरम्यान, पक्षाकडून तिकीट कापल्याने वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांना अश्रू अनावर झालेत. कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी बोलून पुढील निर्णय घेणार असं म्हणत लखन मलिकांनी बंडखोरीचे संकेत दिलेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये आणखी एक इन्कमिंग झालंय. कारंजा लाडच्या सईताई डहाडे यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं. त्यामुळे आता त्यांचा सामना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्ञायक पाटणी यांच्यासोबत रंगताना दिसणार आहे.

Published on: Oct 27, 2024 10:55 AM