Special Report | मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्यावरुन BJP आणि Shivsenaमध्ये शाब्दिक बाण सुरुच
ज्यांनी मुख्यमंत्र्यांवर नामर्दपणाच्या कॉमेंटस केल्या त्यांना चपराक बसलीच आहे. पण त्यांच्या अंतरंगात किती घाण आणि कचरा आहे हे दिसून आलं, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी विरोधकांची चांगलीच पिसे काढली. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर घृणास्पद टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर तोंडसुख घेत होते. त्यांच्या ऑपरेशनबाबत मानवताहीन टीका केली होती. पण मुख्यमंत्री आज समोर आले. उद्यापासून ते सर्व कामात सक्रिय होणार आहेत. राज्यातील विरोधी पक्ष भावनाशून्य होऊन मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करत होता. हे कोणत्याही प्रकारच्या राजकीय नितीमत्तेला धरून नव्हतं. माणुसकीला धरून नव्हतं. मुख्यमंत्री आजारी आहेत, उपचार सुरू आहेत आणि तुम्ही अत्यंत नामर्दपणे मुख्यमंत्र्यावर टीका करत होता. या नामर्दपणाला आज महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एक दोन दिवसांपासून सक्रिय झाले. सकाळी वर्षावर ध्वज फडकवला. ते शिवतीर्थावर आले. दोन दिवसांपासून बैठका घेत आहेत. ज्यांनी मुख्यमंत्र्यांवर नामर्दपणाच्या कॉमेंटस केल्या त्यांना चपराक बसलीच आहे. पण त्यांच्या अंतरंगात किती घाण आणि कचरा आहे हे दिसून आलं, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.