Narayan Rane | चिपळूणमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. नाशिक, सांगली, नागपूर, मुंबई, पुणे येथे शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चिपळूणमध्ये शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स फाडून टाकले. पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.