भाजपच्या दोन याद्या जाहीर पण अद्याप नावच नाही, उदयनराजे भोसले संन्यास घेणार?
भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर पण राजेंचं नाव नाही, उदयनराजे यांनी उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर लढावं अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत. उदयनराजे भोसले यांना त्यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सातारा, १६ मार्च २०२४ : भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या. मात्र अद्याप खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव दिसत नाही. साताऱ्यात अजूनही भाजपनं उदयनराजे भोसले यांची उमेदवारी का जाहीर केली नाही, म्हणून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी भाजपला थेट इशारा दिलाय. दरम्यान, उदयनराजे यांनी उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर लढावं अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत. उदयनराजे भोसले यांना त्यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘महायुतीतील प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या तिकीट मिळावं. तिकीट मिळावं यासाठी प्रत्येक पक्षाची अपेक्षाही योग्यच असते. तीन पक्ष एकत्र आले आहेत. सीट वाटपात पुढे मागे होईल. प्रत्येकाला वाटतं जास्त सीट मिळाव्यात आणि ते रास्त आहे. त्यात चुकीचं नाहीये. जे काही होईल त्यानंतर बघू..तर मी काही संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. संन्यास घेणार नाही यात आलं ना सगळं’, अशी स्पष्ट प्रतिक्रिया राजेंनी व्यक्त केली.