पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी पण कोणता एक उमेदवार पडणार?
महायुतीच्या वाटेला नऊ जागा येत असून भाजपच्या कोट्यातून भाजपने सर्व ५ उमेदवार जाहीर केले. ज्यात पंकजा मुंडेंचं नाव पहिलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या नावाकडेच साऱ्यांच्या नजरा होत्या. तर भाजपने विधान परिषदेवर त्यांना संधी देऊन राजकीय वनवास संपवलाय. मात्र महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिल्याने आता एक उमेदवार नेमका कुणाचा पडणार?
भाजपने विधानपरिषदेसाठी पाच नावांची यादी जाहीर केली. त्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी निश्चित झाली आहे. महायुतीच्या वाटेला नऊ जागा येत असून भाजपच्या कोट्यातून भाजपने सर्व ५ उमेदवार जाहीर केले. ज्यात पंकजा मुंडेंचं नाव पहिलं आहे. यासोबत डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या नावाकडेच साऱ्यांच्या नजरा होत्या. तर भाजपने विधान परिषदेवर त्यांना संधी देऊन राजकीय वनवास संपवलाय. मात्र महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिल्याने आता एक उमेदवार नेमका कुणाचा पडणार? याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडेंच तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. यानंतर आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.