किंचित आणि वंचितचं लिव्ह इन रिलेशनशिप! भाजपच्या भीतीपोटी पळापळ, आशिष शेलार यांचं टीकास्त्र
शिवसेना-वंचित आघाडीच्या युतीवर भाजप नेते आशिष शेलारांची खरमरीत टीका, म्हणाले...
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश अंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात काल युतीची घोषणा झाली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच भाजप नेता आशिष शेलार यांनी या झालेल्या नव्या युतीची जोरदार खिल्ली उडवली आहे. भाजपच्या भितीने उद्धव ठाकरे यांची पळापळ होत आहेत. त्यामुळे किंचित आणि वंचितचं लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असे म्हणत आशिष शेलार यांनी टीकास्त्र डागलं आहे.
शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीवर बोलताना शेलार असेही म्हणाले, कोणीतरी म्हटलं आहे. किंचित आणि वंचित एकत्र आलेत. त्यांचे हे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, आणि भाजपच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होतेय. म्हणून कधी उद्धव ठाकरे मराठी मुस्लिमांच्या मागे लागतात तर कधी वंचित लोकांच्या मागे लागतात.
Published on: Jan 24, 2023 02:34 PM