तर आज तुमच्या ‘भगव्या’ शालीचा रंग… भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला काय?

| Updated on: Mar 17, 2024 | 4:39 PM

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज या यात्रेची सांगता सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेतील उपस्थितीवरून उद्धव ठाकरे यांना भाजप नेत्यानं टोला लगावला आहे.

मुंबई | 17 मार्च 2024 : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज या यात्रेची सांगता सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेतील उपस्थितीवरून उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. ‘सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना घेऊन सावरकर स्मारकात जावे. त्यांना स्मारकात ठेवण्यात आलेला “कोलू” ओढून प्रायश्चित्त करण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी.. तर आज महाराष्ट्र तुमच्या “भगव्या” शालीचा रंग बदलला यावर शिक्कामोर्तब करेल!’ पुढे त्यांनी असेही म्हटले की, उद्धव ठाकरे यांना आज हिंदुत्वाशी “न्याय” करण्याची एक उत्तम संधी आलीय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करावे. तुमचं हिंदुत्व, महाराष्ट्र प्रेम, मराठीपण सिद्ध करण्यासाठी आलेली संधी तुम्ही घालवलीत, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 17, 2024 04:39 PM
आम्हाला कचरा म्हणणाऱ्यांचा एकदिवस…आमश्या पाडवींच्या पक्ष प्रवेशावेळी शिंदेंचा अप्रत्यक्षपणे निशाणा
अखेर ठरलं…महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित, सूत्रांकडून मोठी अपडेट