चावा घेण्याची भाजपची कोणती संस्कृती
सर्वसामान्य माणसांचं रक्षण करण्यासाठी जे हात चोवीस तास कार्यरत असतात त्याच हातांचा चावा भाजपचे लोक घेत असतील तर ते शिवसेना खपवून घेणार नाही असं मत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले
सर्वसामान्य माणसांचं रक्षण करण्यासाठी जे हात चोवीस तास कार्यरत असतात त्याच हातांचा चावा भाजपचे लोक घेत असतील तर ते शिवसेना खपवून घेणार नाही असं मत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले. संस्कृतीविषयी भाजप जोरदार बोलत असते पण हा जो पोलिसांच्या हाताचा चावा घेण्याचा प्रकार आहे ती भाजपची संस्कृती आहे का असा सवालही त्यांनी केला आहे. उद्या होणाऱ्या साडे तीन मंत्र्यांची पोलखोल ही उद्याच बघा असंही त्यांनी यावेळी सुचवलं. हिंदूह्रदयसम्राट राज ठाकरे अशी पोस्टर लागल्यानंतर त्यांच्याविषयी बोलताना त्यांनी राज ठाकरेंनाच हे आवडले का सवाल केला. कारण बाळासाहेब ठाकरे यांना माणसांनी हिंदूह्रदयसम्राट ही उपाधी दिली होती असे त्यांनी सांगितले.