“पेटेन उद्या मी नव्याने…”, हेमंत रासने यांच्याकडून २०२४ ची तयारी? पुण्यात नेमकी काय सुरूये चर्चा बघा…
VIDEO | भाजपचे कसब्यातील उमेदवार हेमंत रासने यांच्याकडून कसब्यात जनसंपर्क कार्यालय उघडण्याची घोषणा? काय आहे नेमका प्रकार...
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक चांगलीच गाजली होती. यानंतर या निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. यानंतर आता भाजपचे कसब्यातील उमेदवार हेमंत रासने यांच्याकडून आतापासूनच कसब्यात जनसंपर्क कार्यालय उघडण्याची घोषणा होऊन बॅनरही झळकले आहेत. या बॅनरवर त्यांनी पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले होते मात्र आता या निवडणुकीनंतरही हेमंत रासने यांनी बॅनरबाजी करत पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही असा इशाराच विरोधकांना त्यांनी दिला आहे. या बॅनरमुळे भाजपसह विरोधकांमध्येही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
Published on: Mar 07, 2023 09:03 PM