हनुमान चालीसा… पुष्पा ते धनुष्यबाण… कोण कुणाला कॉपी करतंय? नवनीत राणांच्या दाव्यांची तिरंदाजी
कधी झुकेगा नही साला... तर कधी धनुष्यातून बाण मारण्याची कला.. तर कधी हनुमान चालिसेच्या आंदोलनातून उठलेला कल्ला... कोणता पक्ष असली आणि कोणता पक्ष नकली असा वाद सुरू असताना नवनीत राणांनी आपणच ओरिजनल असल्याचा दावा राणांनी केला.. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
धनुष्यबाण मारण्याची स्टाईल असो की मग पुष्पा सिनेमातील डायलॉग असो… ब्रँड आपलाच असून आपणच ओरिजनल असल्याचा दावा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केला आहे. कधी झुकेगा नही साला… तर कधी धनुष्यातून बाण मारण्याची कला.. तर कधी हनुमान चालिसेच्या आंदोलनातून उठलेला कल्ला… कोणता पक्ष असली आणि कोणता पक्ष नकली असा वाद सुरू असताना नवनीत राणांनी आपणच ओरिजनल असल्याचा दावा राणांनी केला. राणा म्हणत असलेला ब्रँड म्हणजे एखाद्या दूरदृष्टीच्या निर्णयाने उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व भरारी घेतली किंवा एखाद्या नाविन्यपूर्ण योजनेने कायापालट झाला असं नाही. तर प्रचार आणि आंदोलनात मारलेलेल फिल्मी डायलॉग किंवा स्टाईल याला नवनीत राणा ब्रँड म्हणताय… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 27, 2024 11:40 AM