पंकजा मुंडे यांच्यावर नवनिर्वाचित आमदाराकडून सडकून टीका, ‘ताईंनी मला धोका द्यायला नको होता…’

| Updated on: Nov 24, 2024 | 12:50 PM

सुरेश धस हे 75 हजारांच्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. सुरेश धस विजयी झाल्यानंतर आष्टी मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यादरम्यान आयोजित विजयी सभेत निवडून येताच सुरेश धस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरच सडकून टीका केली आहे.

बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचा विजय झाला आहे. सुरेश धस हे 75 हजारांच्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. सुरेश धस विजयी झाल्यानंतर आष्टी मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यादरम्यान आयोजित विजयी सभेत निवडून येताच सुरेश धस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरच सडकून टीका केली आहे. सुरेश धस आपल्या सभेत म्हणाले, पंकजाताई तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. पंकजाताईंनी मला धोका द्यायला नको होता. पंकजाताईंनी माझ्या विरोधात काम करण्यास कार्यकर्त्यांना सांगितलं असंही सुरेश धस म्हणाले. तर धस यांनी पंकजा मुंडें विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. पंकजाताई तुम्ही एक चांगला व्यक्ती गमावला असल्याचेही धस म्हणाले. दरम्यान, बीडच्या आष्टी मतदारसंघात निकालापूर्वीच भाजपा उमेदवार सुरेश धस यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. या बॅनरवर सुरेश धस यांना विजयाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख देखील करण्यात आला होता. आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश धस निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत झाली. दरम्यान निकालापूर्वीच आष्टीत सुरेश धस यांना शुभेच्छा देणारे बॅनर लक्ष वेधून घेत होते.

Published on: Nov 24, 2024 12:50 PM