पुण्यात दोन्ही दादांनी मारला मिसळीवर ताव, आस्वाद घेत काय रंगल्या गप्पा?

| Updated on: Apr 11, 2024 | 11:26 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मिसळीवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले. मिसळीचा आस्वाद घेताना चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोघांच्या राजकीय गप्पा रंगल्यात. मिसळ खात खात चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांची प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा

राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मिसळीवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले. मिसळीचा आस्वाद घेताना चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोघांच्या राजकीय गप्पा रंगल्यात. मिसळ खात खात चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांची प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून अजित पवार यांना गुढी भेट म्हणून देण्यात आली. महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यात तब्बल 10 हजार किलोची मिसळ बनवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून 10 हजार किलोची मिसळ बवनण्यात आली आहे. गंज पेठेतील महात्मा जोतीबा फुले वाडा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Published on: Apr 11, 2024 11:26 AM
लोकं मला नोट पण देतात अन् वोट पण… निलेश लंकेंच्या मिश्किल वक्तव्याची चर्चा
‘उंची छलांग लगाने के लिये चिता..’, राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर राजू पाटलांची पोस्ट चर्चेत