‘तो’ सर्व्हे 13 कोटी जनतेचा नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व्हेची उडवली खिल्ली
सी व्होटर सर्व्हेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर निशाणा
सी व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला ३४ जागा तर भाजप आणि शिंदे गटाला १४ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या सर्व्हेवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व्हेची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे. सी व्होटरचा सर्व्हे म्हणजे १३ कोटी जनतेचा नाही, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
सी व्होटर सर्व्हेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने भाजप संघटना मजबूत करणार आहे. ५१ मतांच्या मताची टक्केवारी आम्ही तयार करून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा जिंकू, सा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.