राहुल गांधी यांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला काँग्रेसला इशारा; माफी मागा नाहीतर…
VIDEO | राहुल गांधी यांच्या 'त्या' व्हिडीओवरून राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय दिला काँग्रेसला इशारा
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते म्हणाले, काँग्रेसकडून प्रसारित केल्या गेलेल्या एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. या प्रकराबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची मागावी नाहीतर भाजप याविरोधात आंदोलन करेल, असा इशारा बावनकुळे यांनी काँग्रेसला दिला आहे. यासह तो व्हिडीओ डिलीट करण्यासही सांगितले. तर बावनकुळे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन निघाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार पाळणं हे भाजपसाठी चुकीचे असेल तर शिवरायांचा विचार पोहोचवण्याचे काम राहुल गांधींनी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर काळ्या टोपीच्या माणसाने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला तेव्हा कुठे होता असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे.