भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार, अध्यक्षपदी कुणाची वर्णी? ‘ही’ दोन नावं चर्चेत

| Updated on: Jun 11, 2024 | 2:01 PM

केंद्रीय मंत्रिमंडळात जेपी नड्डा गेल्यानंतर आता नव्या चेहऱ्याकडे भाजपची कमान सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या अध्यक्षपदी आता कुणाची वर्णी लागणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर जो कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असेल त्याचं नाव हे आरएसएसच्या मुख्यालयात ठरणार असल्याची माहिती आहे.

Follow us on

भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. जेपी नड्डा केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध जोरदार सुरू झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेपी नड्डा गेल्यानंतर आता नव्या चेहऱ्याकडे भाजपची कमान सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर जेपी नड्डा हे भाजपचे कार्याध्यक्ष होते. यानंतर, त्यांना जानेवारी 2020 मध्ये पूर्णवेळ भाजपाध्यक्ष बनवण्यात आले, जेपी नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जानेवारीत संपला होता, पण त्यानंतर निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळेच आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. अशातच भाजपच्या अध्यक्षपदी आता कुणाची वर्णी लागणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर जो कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असेल त्याचं नाव हे आरएसएसच्या मुख्यालयात ठरणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या अध्यक्षपदाच्या नावाच्या चर्चेत ओम माथूर आणि सुनील बन्सल या दोघांची नावं शर्यतीत आहे.