तिथेच थोबाड का नाही फोडलं? वामन म्हात्रेंच्या वक्तव्यावर चित्रा वाघ भडकल्या, ‘त्या’ महिल्या पत्रकाराचं केलं समर्थन

| Updated on: Aug 21, 2024 | 3:45 PM

बदलापूर येथील शाळेतच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला अर्वाच्च भाषा वापरणारे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष, शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्याविरोधत सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही यावर भाष्य केलं आहे.

‘तू अशा बातम्या देतेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ अशी अर्वाच्य असंवेदनशील भाषा वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला वापरली होती, यावर बोलताना चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्यात. “तिथल्या तिथे त्याचं थोबाड का नाही फोडलं?” असा सवालच चित्रा वाघ यांनी त्या महिला पत्रकाराला विचारला. पुढे त्या असंही म्हणाल्या, याविषयी मी पोलिसांशी बोलते, पण मला असं वाटतं, की कोणीही असूदे, ज्यावेळी असं आपल्याला कुणी बोलतं, तुम्ही का नाही त्याचं थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं. एवढं ऐकून घेईपर्यंत… मी जर काम करत असताना, मला जर कोणी बोलणार असेल, तर तो कोण आहे, हे मी बघणार नाही हो.. ज्या पद्धतीने आपल्याला असं बोललं जातंय, पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे, पण एक महिला म्हणून… सगळ्या ठिकाणी पोलीस पोलीस पोलीस करुन कसं जमेल.. मी सक्षम आहे ना.. मी पत्रकार आहे, मी राजकीय कार्यकर्ती आहे.. मला जर कोणी बोललं तर मी तिथल्या तिथे त्याचं थोबाड फोडेन आणि मग पोलिसांना सांगेन आता करायचं ते करा..” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Published on: Aug 21, 2024 03:45 PM
‘जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय’; बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषा, ‘ती’ रणरागिणी Tv9 मराठीवर
‘तर मी तिचे पाय धरेल…’, ‘त्या’ पत्रकार महिलेवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया काय?